उबाठाच्या आमदार, खासदारांना चार वर्षात जमलं नाही… पण निलेश राणेंनी दोन महिन्यात करून दाखवलं…

पावशी सर्व्हिस रोडचं काम चार दिवसात सुरु होणार ; ग्रा. पं. कार्यालयात भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

कुडाळ : गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते काम भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी केवळ दोन महिन्यात करून दाखविले आहे. पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत सर्व्हिस रोडचे काम करण्याची मागणी मागील चार वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या कामाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले. पण रस्त्याचे काम काही झाले नाही. पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी या संदर्भात निलेश राणे यांची दोन महिन्यापूर्वी भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार निलेश राणे यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार येत्या चार दिवसात हे काम सुरु होणार आहे. पावशी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन या कामाबाबत माहिती दिली.

पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंतच्या अंतरावर ग्रामपंचायत, तलाठी, रास्त धान्य दुकान अशी विविध कार्यालय असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर एस. टी. बस थांबा आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य चौपदरीकरण रस्त्याच्या बाजूने चालत तसेच वाहने घेऊन यावं लागतं. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि या कारणामुळे गेल्या चार वर्षापासून पावशी ग्रामस्थ उबाठा शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्याकडे लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत जाणारा रस्ता सर्विस रोड म्हणून करावा अशी मागणी करत आहेत. मात्र या मागणीला उबाठा शिवसेनेच्या खासदार आमदाराने उडवून लावले. 

दरम्यान पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आणि दोन महिन्यांत पावशी ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला. याबाबत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमवेत अधिकाऱ्यांची पावशी ग्रामपंचायत येथे बैठक घेतली या बैठकीत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. हा सर्विस लवकरच होणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, रुपेश कानडे, सरपंच वैशाली पावसकर, जिल्हा कार्यकारी सदस्य श्रीपाद तवटे, माजी सभापती राजन जाधव, ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार, नयना तवटे, ओंकार करंगुटकर, लीना पवार, स्नेहा पंडित, बुथ अध्यक्ष राजा चव्हाण, रमेश कुंभार, बाबू शेलटे, प्रकाश पावसकर, सागर तुळसकर, सर्वेश पावसकर, मारुती पावसकर, स्वरूप वाळके, आनंद शेलटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!