… हा समस्त मालवणवासियांचा सन्मान ; निलेश राणेंची प्रतिक्रिया
मालवण : राज्यशासनाने आज राज्यातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण, जि. सिंधुदुर्ग असे केले आहे. या निर्णयाबाबत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या “एक्स” सोशल मीडिया अकाउंट वरून प्रतिक्रिया दिली आहे.
“मालवणचे सुपुत्र कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या सन्मानार्थ मालवण ITI या संस्थेचे नामकरण ‘ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण’ असे करण्याचा स्तुत्य निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार, शेकडो कुशल उद्योजक घडविणाऱ्या या औद्योगिक संस्थेचे झालेले नामकरण हे समस्त मालवणवासीयांना सन्मान देणार आहे.” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.