मालवण आयटीआयला ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे नाव ; राज्य शासनाचा निर्णय

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख

मालवण | कुणाल मांजरेकर 

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण या संस्थेचे नामकरण ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण, जि. सिंधुदुर्ग असे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. या बाबत मंत्री लोढा म्हणाले “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श नेतृत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्यविकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे, आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.”

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!