सिंधुदुर्ग महाविद्यालयात उद्या फुगडी संमेलन ; पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजन
महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष, DLLE आणि स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन दिनानिमित्त लोककला पर्यटन या संकल्पनेवर पर्यटन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष, DLLE आणि स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फुगडी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
फुगडी म्हणजे मालवणी लोककलेचा एक आविष्कार असून फुगडी या लोककलेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने फुगडी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये सर्वांनी वेगवेगळ्या फुगड्या घालायच्या आहेत. तसेच यावेळी स्वराज्य ढोल पथकाचे खास आकर्षण असणार आहे. तरी महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थिनी, सर्व विद्यार्थ्यांच्या पालक माता व भगिनी, मालवण आणि पंचक्रोशीतील सर्व महिला, महिलांच्या सामाजिक संस्था तसेच इतर सामाजिक संस्थांच्या महिला सदस्य, फुगडी संघ या सर्वाना या फुगडी संमेलनास उपस्थित राहून या लोककलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग महाविद्यालय व सौ. शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ. सुमेधा नाईक ९४०४९२४६७८ व प्रा. डॉ. उज्वला सामंत ९४२१२६१४३९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.