भैरवी मंदिरात उद्यापासून भजन महोत्सव ; दत्ता सामंत यांच्याहस्ते उदघाटन

१२ ऑक्टोबर पर्यंत चालणार महोत्सव ; जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांची सेवा सादर होणार

मालवण : मालवण बाजारपेठेतील श्री संतसेना महाराज मार्गावरील श्री भैरवी देवालयात गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून भजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  याचे उदघाटन रात्री ८ वाजता उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्हयातील नामवंत डबलबारी भजनाच्या बुवांकडून भजनसेवा करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी या सोहळ्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती श्री भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे नेते विजय शिवा चव्हाण यांनी दिली.

उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्षस्थान नाभिक समाजाचे नेते विजय सीताराम चव्हाण हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, उद्योजक अनिल मालवणकर, विजय केनवडेकर, प्रदीप मुंबरकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या उत्सवाचे पहिले पुष्प ३ रोजी स्वरशक्ती साधना भजन मंडळाचे बुवा कृष्णा कदम हे गुंफणार आहेत. ४ रोजी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रदीप सामंत), ५ रोजी भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ (बुवा सिद्धेश कांबळी), ६ रोजी विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ (बुवा अक्षय परुळेकर), ७ रोजी गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ श्रावण गवळीवाडी (बुवा संजय चव्हाण), ८ रोजी आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ (बुवा चेतन धुरी), ९ रोजी देवकीमाता प्रासादिक भजन मंडळ (बुवा सिद्धेश पाताडे), १० रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ (बुवा सुनील परुळेकर), ११ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कातवड (बुवा मंगेश नलावडे), १२ रोजी वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके) यांची भजने सादर होणार आहेत. या उत्सवात इतरही सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम श्री देवी भैरवी मंदिरात होणार आहेत. तरी भाविकांनी आणि भजन रसिकांनी या भजन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!