महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवणार !

ना. अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास

वाशी, नवी मुंबई येथे कोकण विभागीय भाजपा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा संपन्न

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कोकण विभागातील भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा वाशी, नवी मुंबई येथे पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवू, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!