चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे 

मालवण : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये नितीन गणपत गावडे यांची चौके गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

नितीन गावडे हे चौके गावात गेली अनेक वर्षें पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गावात शैक्षणिक- सामाजिक- धार्मिक कार्यात सदैव सहभागी असतात. त्यांच्या या निवडीबद्दल गावात सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन करण्यात येत आहे. शांत संयमी स्वभाव, सामाजिक कार्याचा अनुभव आणि लोकसंपर्काचा ग्रामपंचायत, गावासाठी आणि गावातील तंटे मिटवण्यासाठी उपयोग होईल असे मत चौके सरपंच गोपाळ चौकेकर यांनी मांडले.यावेळी चौके ग्रामपंचायत उपसरपंच पी.के.चौकेकर, ग्रामसेवक श्री. नलावडे, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, शिवदास मांजरेकर, जेष्ठ ग्रामस्थ सदाशिव गावडे, विजय चौकेकर, दत्तात्रय गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपस्थितानी नूतन तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे यांचे अभिनंदन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!