समुद्रात अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश

मालवण : देवबाग समुद्रात जवळील संगमात अडकलेल्या मच्छीमार तरुणाला मदतकार्य पुरविण्यात स्थानिकांना यश आले आहे. नोकेच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही नौका खोल समुद्रात, जोरदार वाऱ्यात अडकून पडली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

देवबाग येथून आपल्या ताब्यातील दर्यासागर ही मासेमारी नौका घेवून स्वप्निल संजय सावजी (३५ रा. सर्जेकोट) हा मच्छीमार तरुण सर्जेकोट येथे निघाला होता. देवबाग संगम या ठिकाणी नौका घेवून आला असताना नौके मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे स्वप्निल याच्या लक्षात आले. यावेळी त्याने किनाऱ्यावरील स्थानिकांशी मदतीसाठी संपर्क साधला. जोरदार वारा व संगमावरील लाटां मध्ये ही नौका अडकून पडल्याने स्वप्निल याला तात्काळ मदत पुरविणे आवश्यक बनले होते. घटनेची माहिती समजताच किनाऱ्यावरील हरेश राणे, विशाल धुरी, संदीप तांडेल, लक्ष्मण कुमटेकर, संतोष शेलटकर, दिनेश तोरस्कर, ओंकार उपरकर, हर्षल पराडकर यांनी समुद्रात धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने स्वप्निल सावजी याची बोट तेथे दुरुस्त करून त्याला मदत पुरविण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!