मालवण भाजप पदाधिकाऱ्यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सलग दुसऱ्या महिन्यात जनतेच्या समस्या जाणून त्यांना न्याय देण्यासाठी कुडाळ-मालवण मतदार संघाचा जनता दरबार आयोजित करून तो यशस्वी केल्याबद्दल जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे जनतेच्या वतीने आभार मानले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते त्यांचाही आभार मानण्यात आले. यावेळी राजू परुळेकर, आप्पा लुडबे, बबन शिंदे, बाबा परब, संतोष गावकर, ललित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!