मालवण बंदर जेटी रस्त्याच्या सुशोभीकरणाचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन
मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या वतीने मालवण बंदर जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी निधी मंजूर झाला असून निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू वराडकर, राजू बिडये, दामोदर तोडणकर, निशय पालेकर, आबा हडकर, शर्वरी पाटकर, संदीप भोजने, नारायण लुडबे, विक्रांत नाईक यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.