घुमडाई मंदिरातील “श्रावणधारा” महोत्सवाचा आज समारोप ; जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी “चिंतामणी जन्म” संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ “श्रावणधारा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घुमडाई मंदिरात संपन्न झाली. या श्रावणधारा महोत्सवाचा समारोप आज मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. सायंकाळी ५ वा. मान्यवरांच्या हस्ते भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

श्रावण मंगळवार निमित्त घुमडाई मंदिरात गेले महिनाभर श्रावणधारा महोत्सव संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात घेण्यात आले. तर भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचा समारोप आज होणार आहे. मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता “चिंतामणी जन्म” हा संयुक्त दशावताराचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांचा भरणा आहे. तरी श्री देवी घुमडाई मंदिरात होणाऱ्या या मंगल धार्मिक सोहळ्यास भाविक व भजन श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3525

Leave a Reply

error: Content is protected !!