मालवणात गणेश विसर्जन “निर्धोक” ; विसर्जनासाठी विशेष पथक कार्यान्वित

गणेश विसर्जनावेळी दुर्घटना टाळण्यासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळ व कै. आतू फर्नांडीस मित्रमंडळाची दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत सेवा

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात सुरु आहे. मालवणमध्येही गणेशोत्सवाची लगबग सुरु असून गणेश विसर्जनावेळी कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, म्हणून शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि कै. आतू फर्नांडीस मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. या पथकाच्या माध्यमातून शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या समुद्र किनारी मोफत गणेश विसर्जन करण्यात येत आहे. दरवर्षी सुमारे २०० हून अधिक गणपतींचं विसर्जन या पथकाच्या माध्यमातून करण्यात येतं.

मालवणात समुद्र किनारी गणेश विसर्जन करण्यात येतं. या विसर्जनावेळी कोणतीही जीवितहानी घडू नये यासाठी हरी खोबरेकर आणि कै. आतू फर्नांडीस यांच्या वतीने मोफत गणेश विसर्जन पथकाची स्थापना करण्यात आली. कै. आतू फर्नांडीस यांच्या नंतर हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा अखंडितपणे सुरु आहे. या पथकात बॉबी बस्त्याव, बादल फर्नांडीस, भावेश बटाव, रेक्स परेरा, सोमनाथ लांबोर, यश देसाई, तेजस घारकर, रोहित सकपाळ, परेश वाघ, रोशन कांबळी, संचित देसाई, आतिष फर्नांडीस, सोहम हिंदळेकर, ओंकार नाईक, तन्मय यमकर, सुजल कदम, प्रथमेश परब, कार्तिक बटाव, इनो परेरा, जॅकी परेरा यांचा समावेश आहे. या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3840

Leave a Reply

error: Content is protected !!