कुडाळमध्ये ३१ ऑगस्टला सौंदर्यकला प्रशिक्षण व प्रदर्शन शिबीर
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग व सलून ब्युटीपार्लर असोसिएशन यांच्यावतीने आयोजन
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रसाद चव्हाण, हेअर स्टायलिस्ट तुषार चव्हाण यांची उपस्थिती
कुडाळ : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग व सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत शांतादुर्गा हॉल पावशी कुडाळ येथे सौंदर्यकला प्रशिक्षण व प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून सिंधुदुर्गात प्रथमच आधुनिक पध्दतीचे मेकअप व केशकर्तनाचे प्रशिक्षण व प्रदर्शन देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष तसेच सुप्रसिध्द मेकअप आर्टिस्ट प्रसाद दत्तात्रय चव्हाण व मुंबई जिल्हा अध्यक्ष सुप्रसिद्ध हेअर स्टायलीस्ट तुषार चव्हाण व अन्य केशकर्तन मधील नामवंत ट्रेनर या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वेगवेगळ्या शहरातील मोठ्या सलुन सामान कंपन्यांचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. तरी याचा सर्व नाभिक बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटना अध्यक्ष जगदिश सुभाष चव्हाण यांनी केले आहे. राज्य नाभिक महामंडळाचे संघटक विजय सि. चव्हाण व सरचिटणीस राजन पवार व जिल्ह्यातील जेष्ठ नाभिक बांधवांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न होणार आहे.