VIDEO : मालवणात ठाकरे शिवसेना महिला आघाडी व युवतीसेनेचे भरपावसात आत्मक्लेश आंदोलन

महिला अत्याचाराविरोधात ठाकरे गट आक्रमक ; महाविद्यालयीन युवती, महिलांचा देखील आंदोलनाला पाठींबा

मालवण | कुणाल मांजरेकर

बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने फोवकांडा पिंपळ येथे भरपावसात आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महिला व शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

महिलांना सुरक्षा मिळत नसल्याबाबत व अत्याचारातील आरोपीना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याबाबत यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, पंधराशे रुपये नको… सुरक्षा द्या अशा घोषणा यावेळी सहभागी महिलांनी दिल्या. यावेळी पूनम चव्हाण, दीपा शिंदे, सेजल परब, निनाक्षी मेथर, सूर्वी लोणे, माधुरी प्रभू,  तृप्ती मयेकर, रूपा कुडाळकर, रविना लुडबे, लक्ष्मी शिरसेकर, भारती आडकर, दीपा बिरमोळे आदी व इतर महिला आघाडी व युवतीसेनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके तसेच अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!