रॉयल ब्रदर्सच्यावतीने मालवणात सोमवारी नारळ लढवण्याची स्पर्धा

दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजन ; प्रथम विजेत्याला ३१ हजार, द्वितीय क्रमांकाला १५ हजाराचे पारितोषिक ; इतरही आकर्षक बक्षिसे

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील रॉयल ब्रदर्स यांच्या वतीने स्व. दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मालवण बंदर जेटीवर भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला ३१,०००, द्वितीय क्रमांकाला १५,०००, तृतीय क्रमांक ५,०००, चतुर्थ क्रमांक २,५०० व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी ७०० रुपये असून प्रथम १६ संघाना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी स्वतः चे ५ नारळ आणायचे आहेत. उर्वरित नियम स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रॉयल ब्रदर्स यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आनंद आचरेकर ९३२५२०१३७५, हर्ष मिठबावकर ७०३८२३२५७२, सचिन साळगावकर ९३२५३०९९५२, दर्पण सादये ७७४४०९९०५५ यांच्याशी संपर्क साधावा.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!