खासगी स्कुल बस चालक – मालकांनी घेतली भाजपा नेते निलेश राणेंची भेट
प्रवासा दरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा
मालवण : शालेय मुलांची ने आण करणाऱ्या मालवणातील खाजगी स्कुल बस चालक – मालकांनी आज भाजपचे नेते निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्याला उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या. स्कुल बसना बहुतांश वेळा वाहतूक स्तरावरील अधिकाऱ्यांकडून तपासणी त्रास सहन करावा लागतो. यामुळे मुलांना शाळेत वेळेत पोहचवताना अडचणी येत असल्याची समस्या मांडली.
दरम्यान, गावागावातून तसेच शहरात काही अंतरावरून मुलांची शाळेत ने आण करण्यासाठी आपण देत असलेल्या सेवेमध्ये आपल्याला अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ असे सांगत निलेश राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गाडी चालक मालक यांची भूमिका मांडली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, संदीप भोजणे, संतोष गावकर यांसह गाडी चालक मालक सदस्य प्रमोद भोगावकर, ज्ञानदेव चव्हाण, व्ही के जावकर, कॅलीस डिसोजा, वैभव केरकर, विजय पोळ, राजन कुमठेकर, प्रवीण वस्त, अरुण सारंग, दिनेश सुर्वे, गणेश कुमठेकर, चेतन पोळ यासह अन्य उपस्थित होते. सर्वांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.