आचरा गावात पुराचा फटका ; भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

हिर्लेवाडी, पिरावाडी येथे मदतीचे वाटप ; भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये आचरा गावाला पुराचा फटका बसला होता. या पुरात आचरा हिर्लेवाडी, पिरावाडी मधील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. येथील ग्रामस्थांच्या घरातील अन्न धान्य भिजून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंगळवारी या पूरग्रस्ताना आर्थिक मदत देण्यात आली. 

यामध्ये पुर्षोत्तम पेडणेकर, ग्रेसी मार्कुस फर्नाडीस, बस्तियान रॉकी फर्नाडीस, गीता गोविंद गावकर, गोरखनाथ पेडणेकर, सत्यभामा लवू खवणेकर आदी पिडीतांना मदत करण्यात आली. 

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, आचरा सरपंच जेरोंन फर्नाडीस, उपसरपंच संतोष मिराशी, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, संतोष गावकर, रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, प्रशांत पांगे, पांडूरंग वायंगणकर, लवू मालंडकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!