ओवळीये गावातील मयत दशावतारी कलाकाराच्या कुटुंबाला निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत

मालवण : मालवण तालुक्यातील ओवळीये वायंगणीवाडी येथील दशावतारी कलाकार नंदकुमार बाबाजी चव्हाण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून याची माहिती मिळताच भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.  

नंदकुमार चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, चार मुले व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे हे कुटुंब अडचणीत आले असून निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शकीकेंद्र बबन परब, माजी उपसरपंच आशुतोष सावंत, ग्रा. पं. सदस्य अविनाश घाडीगांवकर, बुथ अध्यक्ष विनायक चव्हाण, संतोष गावकर, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!