घुमडे गावातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त अनिल बिरमोळे यांना आ. वैभव नाईकांकडून मदतीचा हात
मालवण : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. तालुक्यातील घुमडे गावात अनिल बिरमोळे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचे नुकसान झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मंगळवारी श्री. बिरमोळे यांना आर्थिक मदत देण्यात आली. तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी ही मदत सुपूर्द केली. यावेळी शिवसेना ठाकरे गट उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर, घुमडे शाखाप्रमुख , युवती सेनेच्या सोनाली डिचवलकर, घुमडे शाखाप्रमुख प्रथमेश बिरमोळे, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष सामंत, दीपा बिरमोळे, सोमनाथ लांबोर आदी उपस्थित होते.