हत्तीरोगग्रस्त मालवण शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निलेश राणेंनी दिली अत्याधुनिक फॉगिंग मशीन
जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत मशीनमुळे हत्तीरोगाला बसणार आळा ; आरोग्य अधिकाऱ्यांनी मानले आभार
मालवण नगरपालिकेला अतिरिक्त २५ कर्मचारी मिळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी निलेश राणेंची चर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अलीकडे शहारात हत्तीरोगाचे चार रुग्ण मिळून आल्याने आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेला स्वखर्चाने जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत फॉगिंग मशीन भेट दिली आहे. या मशीनमुळे पालिकेच्या हत्ती रोग निर्मूलन मोहिमेला मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया पालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आरोग्य विभागाला अतिरिक्त २५ कर्मचारी आवश्यक असून त्याची मागणी जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली असून हे कर्मचारी तातडीने देण्यासाठी निलेश राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी नगरसेवक पंकज सादये, भाई मांजरेकर, आबा हडकर, जॉन नरोन्हा, राकेश सावंत, ललित चव्हाण, निशय पालेकर, निनाद बादेकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, महानंदा खानोलकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मालवण शहरात एकाच वेळी पाचाही प्रभागात फॉगिंग मशीन द्वारे फवारणी व्हावी, अशी मागणी जॉन नरोन्हा यांनी केली.