घुमडे मधील बिरमोळे कुटुंबाचे निलेश राणे यांनी केले सांत्वन
नैसर्गिक आपत्तीत घर कोसळलेल्या अनिल बिरमोळे यांना दिली आर्थिक मदत
मालवण : घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांच्या मातोश्री श्रीमती सुमती विष्णू बिरमोळे यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सोमवारी बिरमोळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सरपंच दिलीप बिरमोळे, सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजेश सावंत, बाळकृष्ण राणे, विष्णू बिरमोळे, अंकित बिरमोळे, राजा बिरमोळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, सरचिटणीस निशय पालेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी येथीलच अनिल बिरमोळे यांच्या घराची भिंत कोसळून मोठी हानी झाली होती. याठिकाणी देखील निलेश राणे यांनी पाहणी करून त्यांना आर्थिक मदत सुपूर्द केली.