जि. प. केंद्र शाळा कट्टा नं. १ आणि जि. प. शाळा गुरामवाडी नं. २ येथे भाजपाच्या वतीने शालेय मुलांना वह्या वाटप

भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती

मालवण : भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी जि. प. केंद्र शाळा कट्टा नंबर १ आणि जि. प. शाळा गुरामवाडी नंबर २ याठिकाणी शालेय मुलांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी सरपंच सतीश वाईरकर, मसुरकर मॅडम वराड, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, महेश वाईरकर, माजी उपसरपंच मकरंद सावंत, माजी उपसरपंच शैलेंद्र शंकरदास, माजी ग्रा.पं. सदस्य गणेश वाईरकर, शाळा अध्यक्ष भिवा गोठणकर, संतोष देऊलकर, प्रशांत गोठणकर, शुभम शंकरदास, प्रवीण गुराम यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!