भाजपा नेते निलेश राणेंचे दातृत्व ; काळसे गावातील नुकसानग्रस्तांना दिला मदतीचा हात

कुडाळ मालवण मतदार संघाचा मागील दहा वर्षाचा विकासाचा बॅक लॉग पुढील पाच वर्षात भरून काढणार : निलेश राणेंची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीत काळसे गावात मोठी हानी झाली आहे. सोमवारी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी काळसे गावाला भेट दिली. यावेळी पुरात पॉवर टिलर पाण्यात बुडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व वादळी वाऱ्यात घरांवर झाडे पडून नुकसान झालेल्या ग्रामस्थांना त्यांनी स्वखर्चाने तातडीची आर्थिक मदत दिली. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही देतानाच मागील दहा वर्षे कुडाळ मालवण मतदार संघांच्या विकासाचा राखडलेला बॅकलॉग पुढील पाच वर्षात आपण भरून काढणार आहोत, काळसे गावातून मागणी झालेले एकही विकासकाम पाच वर्षात शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बॅंक संचालक बाबा परब , काळसे सरपंच सरपंच विशाखा काळसेकर, माजी नगरसेवक पंकज सादये, माजी सभापती राजेंद्र परब, अमृत नार्वेकर, आतिक शेख, शेखर फोंडेकर , सुमित सावंत, विपुल माळगांवकर, कमलाकर आजगावकर, यांच्यासह राकेश सावंत, निशय पालेकर व अन्य पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी वादळी वाऱ्यात घरांची पडझड झालेल्या जितेंद्र प्रताप बागवे, राजश्री कृष्णा घाडी, मिलींद सुधाकर कदम यांना व पुराचा फटका बसून पॉवर टिलरचे नुकसान झालेल्या आनंद नारायण राणे, अनिल भगवान परब, प्रमोद दत्ताराम परब, मंदार आनंद मयेकर, उत्तम लवु परब , सुनिल श्रीधर पावसकर, द्वारकानाथ लक्ष्मण पावसकर, चिंतामणी बाळकृष्ण प्रभु , हनुमंत तुकाराम परब, महेश प्रेमानंद परब, संजय बंडू खोत, रामकृष्ण व्यंकटेश खोत, वामन सखाराम आचरेकर, शैलेश भानू हळदणकर, अजित चंद्रकांत प्रभु, मनोज शंकर मालवणकर, संजय गोपीचंद नाईक, सुभाष हेरेकर, सतीश बाबाजी सरमळकर, नारायण दत्ताराम परब, महेश विनायक प्रभु, संदीप चंद्रकांत शिंग्रे, संदीप सत्यवान गुराम आणि विश्वनाथ सुरेश परब यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यासाठी राजेंद्र परब व जिल्हा बॅंक संचालक बाबा परब यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, यावर्षी झालेल्या वादळी वाऱ्यात आणि पावसात मालवण, कुडाळ मधील शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांना सांगून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे आम्ही मंजूर करून आणणार आहोत. आपणाला आज जी मदत मिळत आहे त्याच श्रेय माझे सहकारी बाबा परब यांचे आहे. त्याबद्दल मी त्यांच विशेष कौतुक करतो. कुडाळ मालवण मधील आजची परिस्थिती बिकट आहे. मागच्या दहा वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. मात्र गेल्या अडीच वर्षात आपलं सरकार आल्यानंतर राणे साहेब आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कधी नव्हे तेवढा निधी कुडाळ मालवणला मिळाला आहे. येणाऱ्या पाच वर्षात काळसे गावातील तुम्ही मागणी केलेलं एकही विकासकाम पूर्ण करायचे शिल्लक ठेवणार नाही. आता कुडाळ मालवणची जबाबदारी आम्ही आमच्या हातात घेतली आहे. राजेंद्र परब सरांसारखा अभ्यासू आणि शेतकऱ्यांची कळकळ असलेला सहकारी आमच्यासोबत आमच्या पहिल्या खासदारकीपासून आहे. तुमचे जे जे प्रश्न असतील ते त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवा. मी ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन, असे निलेश राणे म्हणाले.

यावेळी काळसे सरपंच विशाखा काळसेकर तसेच काळसे गावातील युवा कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!