मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश 

शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थित मालवण येथे केला पक्षप्रवेश 

मालवण : मालवण येथील युवा उद्योजक तथा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांनी आपल्या अनेक युवा सहकारी कार्यकर्ते यांच्यासह शिवसेना उपनेते तथा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. मालवण येथील शिवसेनेच्या बैठकीत हा प्रवेश करण्यात आला.

दरम्यान, रवींद्र फाटक यांनी प्रवेशकर्ते यांचे पक्षात स्वागत केले. जोमाने काम करा, संघटना मजबुतीत योगदान द्या. लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. तुम्ही ही सर्वजण जनसेवेच्या माध्यमातून सतत कार्यरत रहा, असे रवींद्र फाटक यांनी सांगितले. शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख साेनाली पाटकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. 

यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कुडाळ मालवण पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, राजेंद्र फाटक, दीपक वेतकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, खजिनदार भास्कर राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना तालुकाप्रमुख मिहीर राणे, युवतीसेना शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, क्रांती धुरी, योगिता साळुंखे, कमलाकांत पारकर, अरुण तोडणकर, मेहुल धुमाळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!