कोळंब सोमवती समुद्रकिनारा येथील वादळी वाऱ्यामुळे स्मशानशेडचे नुकसान ; हरी खोबरेकरांनी केली पाहणी

तहसीलदारांशी चर्चा करून तात्काळ दुरुस्तीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे पंचनामा सादर करण्याची सूचना

मालवण : कोळंब सोमवती समुद्रकिनारा येथील वादळी वाऱ्यामुळे स्मशानशेड नादुरुस्त झाली आहे. शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी याठिकाणी पाहणी केली. स्मशानशेड तात्काळ दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे. दरम्यान, मालवण तहसीलदारांशी चर्चा करून या स्मशान शेडचा पंचनामा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मधून तात्काळ दुरुस्ती करण्याच्या केल्या सूचना त्यांनी दिल्या असून आमदार वैभव नाईक यांच्याकडे स्मशान सुशोभीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.

यावेळी शिवसेना महिला तालुका संघटक सौ. दिपा शिंदे, शिवसेना महिला तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण, उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रा. पं. सदस्य संजना शेलटकर, ग्रा.पं. सदस्य संपदा प्रभु, संदिप शेलटकर, संतोष शेलटकर, गणेश कांदळगावकर, बापु बावकर, सोमनाथ लांबोर, युवासेना उपशहर युवा अधिकारी अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!