भाजपाच्या मालवण शहरअध्यक्षपदी बाबा मोंडकर
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत केले अभिनंदन
मालवण : भाजपाच्या मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे मोंडकर यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले. दरम्यान, संघटितपणे काम करत असताना विधानसभा निवडणुकीत शहरातून मोठे मताधिक्य देण्यासाठी तसेच मालवण नगरपरिषद निवडणुकीत मोठया विजयासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणेच असणार. त्यांच्या विजयात मालवणातून मोठे मताधिक्य निश्चित आहे. असाही ठाम विश्वास बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, जगदीश गांवकर, जॉन नरोना, महेश मांजरेकर, बबलु राऊत, आबा हडकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, अमिता न्हिवेकर, राजु आंबेरकर, बबन परुळेकर, महेश सारंग, विजय निकम, राजु बिडये, नंदू देसाई, दत्तात्रय केळुसकर, नारायण धुरी, मिलिंद झाड, रवींद्र खानविलकर, राम चोपडेकर, सहदेव साळगावकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, शहर सरचिटणीस निषय पालेकर, कॅलिस फर्नांडिस, रोहन पेंडूरकर, दादा कोचरेकर, दिलीप सांगवेकर, निलेश लुडबे, आप्पा मोरजकर, राजा मांजरेकर, लुडबे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
मालवण कुडाळ मतदारसंघात आपल्या हक्काचा आमदार मोठया मताधिक्याने विजयी करूया. लोकसभेत जसा हा मतदारसंघ मोठे मताधिक्य देण्यात लक्षवेधी राहिला त्याच प्रमाणे सर्वांच्या संघटित कार्यातून मोठा विजय मिळवूया. असा निर्धार यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, पूजा करलकर, धोंडी चिंदरकर यांनी विचार मांडले. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे मोठे मताधिक्य मालवण शहरातून मिळाले त्याच पद्धतीने मोठे मताधिक्य विधानसभेत देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
भाजपाचा सुवर्णकाळ : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
जनतेच्या पाठिंब्याने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपायुती सरकार पुन्हा विजयी झाले. तर राज्यात भाजपा महायुती सरकार लोकप्रिय ठरतआहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात लोकनेते नारायण राणे साहेब यांच्या रूपाने हक्काचे खासदार विजयी झाले. भाजपाचा हा सुवर्णकाळ आहे. यात जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संधी दिली. तसेच निलेश राणे, नितेश राणे, राजन तेली, अतुल कळसेकर यांसह जेष्ठ सहकारी यांचे मार्गदर्शन व सर्व सहकारी यांचे सहकार्य यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा एकवर्ष कार्यकाळ पुर्ण होत असताना सर्वांचे ऋणी असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.