मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचा उपक्रम

मालवण : आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्याच्या माध्यमातून व  मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या कालावधीतही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले. 

यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, दशरथ कवटकर, विभागप्रमुख प्रवीण लुडबे, शाखाप्रमुख मोहन मराळ, किशोर गावकर, सुहास वालावलकर, आ.वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, प्रसाद आडवणकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, सोनाली शिरोडकर, नीना मुंबरकर, भारती आडकर, मेघा शेलटकर आदींसह सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!