आगामी निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने कामाला लागा !
आ. वैभव नाईक यांचे आवाहन ; मालवण तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न
कुणाल मांजरेकर
मालवण : शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली एकजुट दाखवून गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम करावी. विभागवार, गावागावात बैठका घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपर्यत पोहोचवा. पदाधिकारी कार्यकर्त्यानी लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यावर भर देतानाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले आहे.
मालवण तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक शनिवारी जानकी मंगल कार्यालय येथे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. वैभव नाईक बोलत होते. याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, नितीन वाळके, बाळ महाभोज, भाई कासवकर, भाऊ परब, बाबी जोगी, सौ. शिंदे, कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, श्वेता सावंत, सेजल परब, समीर हडकर यांसह मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, संघटक, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख उपस्थित होते.