महारुद्र स्वाहाकारसाठी निलेश राणेंकडून एक लाखाची देणगी ; देवस्थान कमिटीच्या वतीने सत्कार
मालवण : गावात सुख शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यावतीने ११, १२, १३ जुलै रोजी ‘महारुद्र स्वाहाकार’ आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी श्री देव रामेश्वर मंदिर येथे दर्शन घेत ‘महारुद्र स्वाहाकार’ साठी एक लाख रुपये देणगी देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली. दरम्यान, देवस्थान कमिटीच्या वतीने निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘महारुद्र स्वाहाकार’ धार्मिक कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त, गांवकर, मानकरी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष हरीश गांवकर, अरविंद गांवकर, बाबाजी गांवकर, गणपत गांवकर, उदय गांवकर, राजन गांवकर, आप्पा गांवकर, महेश गांवकर, आनंद गांवकर, शिताकांत गांवकर, दादा गांवकर, कल्पेश गांवकर, योगेश गांवकर, अभय गांवकर, विजय गांवकर, राजन बादेकर, दिनेश गांवकर, राजु गांवकर, अक्षय गांवकर, संजय लुडबे आदी देवस्थान कमिटी तसेच भाजपा पदाधिकारी अशोक सावंत, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, जगदीश गांवकर, पूजा करलकर, राजु वराडकर, आबा हडकर, अशोक तोडणकर, रवी मालवणकर, राजु बिडये, अमोल केळुसकर, वसंत गावकर, कुबल, नारायण लुडबे, विक्रांत नाईक यांसह अन्य उपस्थित होते.