लायन्स क्लब मालवणच्या वतीने डॉक्टर, कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान

मालवण (कुणाल मांजरेकर) : लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने १ जुलै या डॉक्टर्स डे, कृषी दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय सेवा देणाऱ्या मालवण मधील डॉक्टर्स, कृषी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यात रेडकर हॉस्पीटलचे डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. यज्ञा तारी, डॉ सुपिया गवस, दिघे दवाखान्याचे डॉ. सचिन दिघे, डॉ. अश्विन दिघे, पाटील हॉस्पीटलचे डॉ. संजय पाटील, झाटये हॉस्पिटलचे डॉ. शशिकांत झाटये, डॉ. अमोल झाटये, डॉ. मालविका झाटये या नामांकित डॉक्टर्सचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच कृषी दिनानिमीत्त कृषी अधिकारी आणि सहकारी यांचा कल्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी लायन्स क्लबचे २०२४-२५ चे नवनिर्वाचीत अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फेनी फर्नाडीस, ट्रेझरर पल्लवी खानोलकर, अनुष्का चव्हाण, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, रुपा कांदळगावकर, राधिका मोंडकर, दिक्षा गावकर, मनीषा गावंकर, नंदीनी गांवकर, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, सहदेव बापार्डेकर, उमेश शिरोडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, सी ए दिनानिमित्त चार्टड अकाउंटंट फाटक यांचा देखील सत्कार करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!