कोकण पदवीधर निवडणूक : मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान ; भाजपा महायुतीकडून आ. निरंजन डावखरे यांच्या विजयाचा विश्वास

मालवण : कोकण पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात असले तरी भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात खरी लढत मानली जात आहे. मात्र मालवण मध्ये महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आ. डावखरे सलग तिसऱ्यांदा विजयी होतील, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

मालवण तालुक्यात एकूण पाच मतदान केंद्रावर मतदान झाले. यात आचरा केंद्रावर २७७ पैकी २३१, मालवण शहर तहसील कार्यालय येथे दोन मतदान केंद्र त्यापैकी एका केंद्रावर ४६३ पैकी ३६७, तर दुसऱ्या केंद्रावर ५२८ पैकी ३९२, मसुरे केंद्रावर १७० पैकी १४६, तर कट्टा केंद्रावर ४०७ पैकी ३५६ मतदारांनी मतदान केले. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मालवण केंद्राबाहेर भाजपा महायुतीच्या बुथवर पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते. भाजप महायुतीचे उमेदवार आम. निरंजन डावखरे यांच्या विजयाच्या विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!