संजय नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कट्टा येथे रविवारी ७ जुलैला शोकसभा

मालवण : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे  मुख्याध्यापक संजय नाईक यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर संजय नाईक सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने रविवारी ७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय (माडये हॉल) येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!