देवबागात जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची सुटका
मालवण : पावसाळ्यात जाळ्यात गुरफटलेल्या अवस्थेत समुद्री कासवे किनाऱ्याला सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देवबाग येथे मंगळवारी दोन समुद्री कासवे जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत येथील मच्छिमारांना सापडून आली. त्यांची पंकज मालंडकर, नितिन बांदेकर, संदिप चिंदरकर, बाबा कुमठेकर, देवानंद चिंदरकर, दिपराज मालंडकर या मच्छिमारांनी जाळ्यातून सुटका करत त्यांना समुद्रात सोडले. त्याचबरोबर तारकर्ली येथे दुर्मिळ असे हॉक्सबिल प्रजातीचे कासव किनाऱ्यावर सापडले. या कासवाची येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड वॉटर स्पोर्ट्स (इसदा) च्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली.