शिक्षक भारती मालवण शाखेत ६७ नवनियुक्त शिक्षकांचा प्रवेश

नवनियुक्त शिक्षकांची शिक्षक भारती संघटनेलाच पसंती ; उर्वरीत शिक्षक प्रवेशाच्या तयारीत

मालवण (कुणाल मांजरेकर)

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण  यांच्या वतीने कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात सोमवारी शिक्षक सन्मान व जाहीर प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मालवण तालुक्यातील ८५ कार्यरत नवनियुक्त शिक्षकांपैकी ६७ शिक्षकांनी शिक्षक भारतीत जाहीर प्रवेश केला. उर्वरीत शिक्षक देखील शिक्षक भारतीत लवकरच प्रवेश करतील, असा विश्वास मालवण  तालुकाअध्यक्ष दिनकर शिरवलकर, सचिव कृष्णा कालकुंद्रीकर यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षक भारतीचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनियुक्त शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेने शिक्षक भरती होण्यासाठी केलेले सहकार्य आणि सेवेत आल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवलेली कामकाजाची पद्धत याने प्रभावित होऊन शिक्षक भारती संघटना हा विश्वसनीय पर्याय असल्याने शिक्षक भारती संघटनेत स्वेच्छेने सामील होत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात योगिता नेहाले यांच्या सुमधुर गीताने झाली. या कार्यक्रमांत किसन दुखंडे यांच्या पुढाकाराने १५ गरजू विद्यार्थ्यांना १५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक भारती सभासदांच्या यशस्वी पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. काही आकस्मिक कारणास्तव उपस्थित नसणाऱ्या नवनियुक्त शिक्षकांनी आपण शिक्षक भारती संघटनेमध्येच सभासद होत असल्याचे मालवण कार्यकारिणी सदस्य यांना संपर्क साधत कळविले आहे. जाहीर प्रवेश व कार्यकारिणी विस्तार देखील यावेळी कऱण्यात आला.

यावेळी शिक्षक भरती लढ्यातील अग्रणी श्रीम. राधिका जगदाळे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच भाग्यश्री भोसले, राजश्री बदरखे, सर्जेराव घुटे, अस्मा तांबोळी, श्याम ताठे यांनी भरतीचा इतिहास व प्रवास सांगितला. यावेळी राज्य संघटक किसन दुखडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या नेहा गवाणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सातवसे , मंगेश बागवे, शिक्षक नेते संतोष परब, संतोष कोचरेकर, धानजी चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष शितल परुळेकर, सचिव सेजल परब, उपाध्यक्षा स्मिता गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष विनेश जाधव, मालवण तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक भारती संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कालकुंद्रीकर यांनी व सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!