दहावी, बारावीच्या यशानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकणारे यश मिळवावे !
आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; मालवणात आ. नाईक आणि युवासेनेच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत मुलांचा सत्कार
मालवण : आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना मालवणच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल येथे संपन्न झाला. दहावी, बारावी परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांनी मालवणातील गुणवंतांची परंपरा कायम राखली असून ही परंपरा यापुढेही सुरूच राहिली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. त्यामुळे दहावी व बारावीत यश मिळविले तरीही पुढील वाटचालीत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकणारे यश मिळवावे, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितिन वाळके, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मंदार सावंत, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना प्रमुख अधिकारी शिल्पा खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी मेतर, युवतीसेना उपविभागप्रमुख सोनाली डिचोलकर आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील प्रत्येक हायस्कुल मधील दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या तसेच तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावी परीक्षेत शाखा निहाय प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आमदार नाईक म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन वाढविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करावी. दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत प्रवेश प्रक्रिया, विविध दाखले मिळविण्यात येणाऱ्या अडचणी ठाकरे शिवसेनेकडून सोडविण्यात येतील. यावेळी हरी खोबरेकर यांनी विद्यार्थ्यांनी शिकत राहिले पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल स्वीकारत प्रगती साधली पाहिजे असे सांगितले. तर भाई गोवेकर, नितीन वाळके, प्राचार्य मंदार सावंत, पूनम चव्हाण, शिल्पा खोत यांनीही मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अनंत पाटकर यांनी केले. यावेळी सन्मेष परब, माधुरी प्रभू, दत्ता पोईपकर, राजेश गावकर, बंड्या सरमळकर, चंदू खोबरेकर, नाना नाईक, चिंतामणी मयेकर, हेमंत मोंडकर, उमेश मांजरेकर, अमित भोगले, दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम इतर कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.