मालवण शहरातील “हा” मुख्य रस्ता पुढील आठवडाभर वाहतुकीस राहणार बंद

मालवण नगरपालिकेच्या बांधकाम विभागाची माहिती ; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी पर्यंतच्या रस्त्यावर दरवर्षी पावसामुळे पाणी साचण्याचे प्रकार घडून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने येथील पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी आरसीसी रोड क्रॉसिंग गटार बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य मार्ग क्र. १८२ (मालवण कसाल) वझे कॉर्नर ते मामा वरेरकर नाटयगृह ते हॉटेल स्वामी ते भरड मार्गावरील वाहतूक १४/०६/२०२४ पासून पुढील किमान ०७ दिवस बंद राहणार आहे. यादरम्यान मालवण नगरपरिषद हद्दीतील नागरीक, येणा-या पर्यटक, वाहनधारक, पादचा-यांनी व विदयार्थ्यांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आवश्यक ती खबरदारी व नोंद घेऊन नगरपरिषदेच्या सार्वजनिक सोयीसुविधेच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!