युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे रोपवाटप कार्यक्रम
युवासेना व शिवसेना मालवण तालुका यांच्या विद्यमाने आदित्य ठाकरे यांना सामाजिक कार्यक्रमातून शुभेच्छा
मालवण : राज्याच्या पर्यटन वृद्धिबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असणारे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्यातील नागरिकांना गुरुवारी काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब, उमेश मांजरेकर, अनंत पाटकर, किरण वाळके, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, नाना नाईक, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर आदी युवासैनिक, शिवसैनिक व सामान्य नागरिक उपस्थित होते.