आभाळमाया ग्रुपच्या वतीने वराड ग्रामपंचायत येथे १६ जूनला रक्तदान शिबीर
जी एस फिटनेस यांचे सहआयोजन ; “आभाळमाया”चे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मालवण | कुणाल मांजरेकर
अल्पावधीतच लोकप्रिय बनलेल्या आभाळमाया ग्रुप आणि जी एस फिटनेस यांच्या वतीने रविवारी १६ जुन रोजी वराड ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबीर होत असून ग्रुपच्या वतीने आयोजित केलेले हे १० वे रक्तदान शिबीर आहे.
आभाळमाया ग्रुप आणि रक्तदान एक आगळं वेगळं नातं बनलं आहे. कट्टा पंचक्रोशीच नव्हे तर गोवा मेडिकल कॉलेज येथे सुध्दा जेव्हा रूग्णांना रक्ताची गरज पडते, तेव्हा आभाळमाया ग्रुपचा कोणीतरी सदस्य तेथे कार्ड घेऊन किंवा बदली रक्त देण्यासाठी तत्पर असतो. कोरोना काळात पहिल्यांदा आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या १९ जून या जन्मदिनी पहिले रक्तदान शिबिर घेण्यात आले आणि ते कार्य आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. दरवर्षी या दिवसाचे व कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीच्या दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत नऊवेळा रक्तदान शिबीर आयोजित करून या माध्यमातून अनेक रूग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला. १९ जुन रोजी राकेश डगरे यांचा वाढदिवस आहे. पण सुट्टीच्या दिवशी आणि सर्वांना सोयीचे व्हावे यासाठी रविवार दि.१६ जून रोजी वराड ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिराला जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.