लोकसभा निकालानंतर निलेश राणे आक्रमक मूडमध्ये ; थेट रत्नागिरीवर सांगितला दावा

रत्नागिरी मतदार संघ पारंपरिक भाजपचा, तो आम्ही घेणार : निलेश राणे

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याने मोठा वाटा उचलला आहे. या निकालानंतर भाजपा नेते निलेश राणे आक्रमक मूडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजापूर मतदार संघावर दावा केला होता. या पाठोपाठ भाजपा नेते निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वर पोस्ट करीत रत्नागिरी मतदार संघावर देखील भाजपचा दावा केला आहे. या मतदार संघातून शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे प्रतिनिधित्व करतात. याच मतदार संघावर निलेश राणे यांनी दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याबाबत निलेश राणे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार”. 

रत्नागिरी मतदार संघ हा मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ असून त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूर मतदार संघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. या दोन्ही मतदार संघांवर नारायण राणेंच्या सुपुत्रांनी भाजपचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!