मालवण शहरात नारायण राणेंना मोठे मताधिक्य ; दीपक पाटकर यांनी मानले आभार
राणेसाहेबांच्या विजयात शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक यांसह मच्छिमार आणि महिला वर्गाचा मोठा हातभार
मालवण | कुणाल मांजरेकर
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा नेते नारायण राणे यांना १२५७ मताधिक्य मिळाले आहे. अलीकडे काही निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित मताधिक्य मिळत नसताना या निवडणुकीत मालवणच्या मतदारांनी राणेसाहेबांना मताधिक्य देऊन विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. राणेसाहेबांच्या विजयात शहरातील व्यापारी, मच्छिमार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक आणि महिला वर्गाचा मोठा हातभार असून शहर भाजपाच्या वतीने आपण या सर्वांचे आभार मानत आहोत. यापुढील काळात शहरातील विकासाचे प्रश्न राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा महायुती कडून राणेसाहेबांच्या नावाची अखेरच्या क्षणी घोषणा होऊन देखील शहरातील जनता, व्यापारी, मच्छीमारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. प्रचारा दरम्यान याचा वारंवार प्रत्यय आला. शहरातील व्यापारी, किनारपट्टी भागातील मच्छिमार बांधव आणि भगिनींचा उत्साह तर वाखाणण्याजोगा होता. शहरात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, युवक शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, मोहन वराडकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, पूजा वेरलकर, शर्वरी पाटकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, अर्चना मिठबावकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, तारका चव्हाण, तुलसी चव्हाण यांच्यासह देऊळवाडा मित्रमंडळ, शहरातील भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे आम्ही ऋणी आहोत, असे दीपक पाटकर यांनी म्हटले आहे.