कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार

आ. निरंजन डावखरेंची ग्वाही ; मालवण भाजपा कार्यालयात कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी मालवण येथील भाजपा कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मतदान प्रक्रियेची माहिती देतानाच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एमपीएससी आणि युपीएससी अभ्यास सेंटर सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून हे सेंटर सुरु झाले आहे. ना. चव्हाण या जिल्ह्याचे देखील पालकमंत्री असून त्यामुळे निश्चितच येथे देखील लवकरात लवकर हे सेंटर सुरु होईल, असे ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यात ग्रंथालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केली असून याचे अनुकरण देखील जिल्ह्यात केले जाईल, असे आ. डावखरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर प्रभारी विजय केनवडेकर, बाबा मोंडकर, बाबा परब, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुधीर साळसकर, राजन गावकर, दीपक मेस्त्री, संतोष गावकर, महेश मांजरेकर, ललित चव्हाण, अनिल न्हीवेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, निशय पालेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. डावखरे यांनी पदवीधर निवडणुकी बाबत सविस्तर मार्गदशन केले. आमदारकीच्या काळात येथील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करून ते मार्गी लावले.  राहून गेलेली कामे पुढील काळात पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मतदानावेळी पावसाळी परिस्थिती विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराला तीन वेळा संपर्क करा. मतदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगणे गरजेचे असून मतदारांना माहिती पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. मतदार संघातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कुल करण्यासाठी प्रत्येक शाळेत सॉलर पॅनल लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे शाळेच्या विज बिलात कमी होऊन ते पैसे शाळेला गुणवत्ता वाढीसाठी वापरता येतील, असे ते म्हणाले.

यावेळी अतुल कळसेकर म्हणाले, मागची निवडणूक व आताची निवडणूक यामध्ये फरक आहे. आता मतदार संख्या वाढली आहे. कुठलेच केंद्र 250 च्या खाली नाही. आपलं नेटवर्क जेवढं स्टँग आहे तेवढं कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे मतदारांचे वर्गीकरण करा. जेवढं चांगल विश्लेषण कराल तेवढा अधिक फायदा मिळेल. मतदारांना मतदान केंद्रपर्यंत कस नेणार हे महत्वाचे आहे. आपल्याला पहिल्या फेरीत जिंकायच आहे. 80 ते 90 हजार मत पहिल्या पसंतीची मिळाली पाहिजेत. इतर कोणत्याही उमेदवाराचा विचार करू नका. मतदानासाठी फार कमी दिवस आहेत. त्यासाठी ३ जुन पूर्वी गाव निहाय यादी तयार करा. आपला उमेदवार सर्व परिचित आहे. सलग तिसऱ्यांदा ते उभे आहेत. त्यांना मतदार संघाची, कामकाजाची माहिती आहे, त्यामुळे आपली रचना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पदवीधर निवडणुकीत कुडाळ आणि मालवणसाठी वेगळं नियोजन केल आहे. या दोन तालुक्यात आपलं संघटनात्मक काम चांगलं आहे. लोकसभा निवडणुकीत येथे आपण चांगल काम केले. तोच टेम्पो या निवडणुकीत ठेऊया. आ. डावखरेनी मालवणला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. थोडीफार कामे उरली असली तर केली जातील. या निवडणुकीच्या माध्यमातून शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी प्रत्येकाने काम करा, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!