किल्ले प्रवासी वाहतूक, जलवाहतूक व साहसी जलक्रिडाना १० जूनपर्यंत मुदतवाढ द्या
आ. वैभव नाईक यांची महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
मालवण : सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जलवाहतूक व साहसी जलक्रिडाना १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दरवर्षी किल्ले प्रवासी वाहतूक व जलवाहतूक व सागरी सहासी क्रिडा २५ मे रोजी बंद करण्याच्या सुचना देण्यात येतात. गेल्या वर्षी मान्सुन १० जुन पर्यंत रखडल्याने २५ मे नंतर येणाऱ्या पर्यटकांची हिरेमोड होत होती. यावर्षी देखील हवामान खात्याने १२ जुन पर्यंत मान्सुन येणार नसल्याचे जाहिर केले आहे. तरी यावर्षीची किल्ले प्रवासी वाहतूक व जलवाहतूक व सागरी साहसी क्रिडा १० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे आ. नाईक यांनी म्हटले आहे.