असरोंडीमध्ये ठाकरे सेनेचे सक्रिय कार्यकर्ते भाजपात ; दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ठाकरे सेनेच्या सोनू सावळाराम घाडीगांवकर आणि मयूर सुरेश घाडीगांवकर यांनी रविवारी भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. गावातील विकासकामे मार्गी लावण्याची ताकद फक्त भाजपात असून यासाठीच आम्ही भाजपात जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

यावेळी माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी सरपंच मकरंद राणे, मिहीर राणे, मालवणचे माजी माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, जॉन नरोन्हा यांच्यासह गावातील भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!