श्री देवी घुमडाई मंदिराचा आज १३ वा वर्धापन दिन सोहळा ; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री घुमडाई देवीच्या मंदिराचा १३ वा वर्धापन दिन सोहळा आज बुधवार दि. ८ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा होत आहे. या निमित्ताने सकाळी ८ वा. पासून विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी ११ वा. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वा. पालखी सोहळा, दुपारी १ वा. पासून महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. सुश्राव्य भजने, रात्री ९ वाजता स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केले आहे.