पडवे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा !

सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश ;: ठाकरे गट कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थही भाजपात 

मालवण : कुडाळ तालुक्यातील पडवे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पडवे ग्रामपंचायत मधील श्री देव रवळनाथ परिवर्तन पॅनलच्या सरपंच, उपसरपंच यासह पाच सदस्यांनी रविवारी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुकळवाड येथील भाजपच्या जाहीर प्रचार सभेत केंद्रीयमंत्री तथा लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यापूर्वी या ग्रा. पं. वर भाजपचे दोन सदस्य होते. आता ही संपूर्ण ग्रामपंचायत भाजपमय झाली आहे. 

प्रवेशकर्त्यांमध्ये सरपंच आनंद शंकर दामोदर, उपसरपंच मृणाली परब, सदस्य धनेश तिरोडकर, विजयालक्ष्मी परब, प्रतिभा गावडे, संगीता नलावडे, माजी सरपंच सुभाष दळवी यासह ठाकरे गटाचे अजय पार्टे, रवी पार्टे, आकाश तारापुरे, शुभम घाडीगांवकर, करीम शेख, करीना शेख, शंकर बोभाटे, लक्ष्मण शिर्के, प्राची शिर्के, सिद्धेश मोहिते, बाळकृष्ण परब, धयाजी परब, सीताराम परब, गोविंद परब, दीपक परब, तुषार परब, रुपेश परब, कविता परब, स्नेहा परब, कल्पना कदम, सुनीता परब, दादा गावडे, वेदांत परब, विष्णू परब, वैशाली परब, सत्यवान परब, मनीषा परब, साक्षी परब, लक्ष्मी परब, सायली धुरी, विजय शिर्के, रसिका पार्टे, मनोहर तारापुरे, अशोक तारापुरे, अनंत तारापुरे, बाळा पडवेकर, राहुल शिर्के, कल्पेश शिर्के, प्रशांत परब, प्रवीण गाडगे, पांडुरंग गाडगे, स्वप्नील गाडगे, उत्तम गाडगे, सिद्धेश पार्टे, सतीश दामोदर, शंकर दामोदर, मंदार दामोदर, लवू परब, भगवान शिर्के, सायली दामोदर, रोशन शिर्के, स्वप्नील गाडगे, तुषार पाटील, बाळू पाटील यांचा समावेश आहे. सर्व प्रवेशकर्ते यांचे ना. नारायण राणे व भाजपा पदाधिकारी यांनी पक्षात स्वागत केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!