पेंडूरचे माजी सरपंच दादा वायंगणकर यांची भाजपात घरवापसी ; माजी पं. स. सदस्या भाग्यता वायंगणकर यांचाही प्रवेश
सुकळवाड येथील जाहीर सभेत केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
दहा वर्षात खासदार विनायक राऊत यांच्याकडून पेंडूर गावात विकासाचे एकही काम झाले नसल्याचा आरोप
मालवण | कुणाल मांजरेकर
पेंडूर गावातील उबाठाचे स्थानिक नेते, माजी सरपंच दादा वायंगणकर आणि त्यांच्या पत्नी माजी पं.स. सदस्या सौ. भाग्यता वायंगणकर यांनी भाजपात घरवापसी केली आहे. सुकळवाड येथे रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जाहीर सभेवेळी त्यांनी हा प्रवेश केला.
काही वर्षांपूर्वी त्यांनी राणेंची साथ सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षात पेंडूर गावात विकासाचे कोणतेही काम न केल्याने आम्ही भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचे वायंगणकर दाम्पत्याने सांगितले. वायंगणकर दाम्पत्याच्या भाजपा मधील घरवापसीमुळे पेंडूर गावात भाजपाला बळ मिळाले असून लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना गावातून ७० ते ७५ % मतदान मिळवून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.