कुडाळ तालुक्यातील बांव गावात ठाकरे गटाला धक्का ; शाखाप्रमुखासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश : गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही

कुडाळ | कुणाल मांजरेकर

कुडाळ तालुक्यातील बांव गावात भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख श्रावण सावंत यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी दत्ता सामंत, कुडाळचे माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री भाजपात प्रवेश केला. गावातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली असता केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून येथील शाश्वत विकासाची कामे मार्गी लावली जातील, असा शब्द दत्ता सामंत यांनी दिला. 

यावेळी संजय बावकर, प्रदीप परब, दत्तात्रय परब, वैभव परब यांच्यासह ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. या प्रसंगी विनायक राणे, कुडाळचे माजी सभापती अभय परब, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!