माणगांवात उबाठाला धक्क्यावर धक्के सुरूच ; युवासेना माजी विभागप्रमुख, ग्रा. पं. सदस्या ग्रामस्थांसह भाजपात !

दत्ता सामंत यांची उपस्थिती ; ढोलकरवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण राणेवाडीचा भाजपात प्रवेश.

माणगांव | कुणाल मांजरेकर

कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. माणगाव ढोलकरवाडी येथील राणेवाडी मधील ग्रामस्थांनी शनिवारी रात्री भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी युवासेना माजी विभागप्रमुख आपा मुंज व माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी मुंज यांनी देखील भाजपात प्रवेश केला. या गावातील विकासाची जबाबदारी यापुढे भाजपाची राहील, अशी ग्वाही दत्ता सामंत यांनी यावेळी देऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या गावातून मोठे मताधिक्य द्या, राणे साहेबांच्या महाविजयानंतर त्यांना या गावात आणून येथील विकास कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दत्ता सामंत यांनी दिली. 

मागील काही दिवस माणगांव मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी उबाठाला जोरदार सुरुंग लावला आहे. शनिवारी रात्री पुन्हा एकदा भाजपाने येथील उबाठा गटाला धक्का दिला. यावेळी सचिन धुरी, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गोविंद राणे, मोहन राणे, राजन राणे, महादेव राणे, अनिल राणे, लक्ष्मण राणे, महादेव राणे, चंद्रकांत राणे, ओंकार राणे, आनंद राणे, महेश राणे, सिद्धेश राणे, प्रथमेश राणे, दादा जुवेकर, संकेत राणे, रेश्मा राणे, लक्ष्मी राणे, सायली राणे, संध्या राणे, योगेश राणे, सुप्रिया राणे, रसिका राणे, रविना राणे, स्वप्नाली राणे, सचिन राणे, विनंती राणे, सोहम राणे, पार्वती राणे, सुजल जुवेकर, स्वप्नील राणे, भागीरथी राणे आदींनी भाजपात प्रवेश केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!