दुर्लक्ष भोवलं, उबाठाच्या हातातून तेंडोली गाव निसटलं !

भाजपा नेते दत्ता सामंतांच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांसह भाजपात प्रवेश !

महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना गावातून किमान ८० % मतदान देण्याचा एकमुखी निर्णय

कुडाळ | कुणाल मांजरेकर

मागील दहा वर्षे गावातील रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत विकास कामांकडे झालेला दुर्लक्ष उबाठाच्या आमदार, खासदारांना भोवला आहे. येथील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी रात्री भाजपात प्रवेश करीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना पाठींबा जाहीर केला आहे. यामध्ये तेंडोली तांबाडगेवाडी, तेंडोली गावठणवाडी, तेंडोली कुंभारवाडी येथील उबाठाचे कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थानी प्रवेश केला असून तेंडोली खरावतेवाडी, बोंडाळ गाळवे, घांगार्डेवाडी येथील ग्रामस्थांनी ना. नारायण राणे यांना या निवडणुकीत एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे.

तेंडोली गावावर अलीकडील दहा वर्षे शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत ठाकरे गटाच्या पाठीशी राहून देखील गावातील रस्ते, पाणी यासारख्या गरजा सोडवण्यात उबाठा गटाला अपयश आल्याने येथील ग्रामस्थ आणि उबाठा कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी सभापती अभय परब, निलेश तेंडुलकर, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तेंडोली तांबाडगेवाडी येथील मेघश्याम राऊळ, सुहास राऊळ, सुचित राऊळ, सुरेश राऊळ, विलास राऊळ, सचिन राऊळ, महेंद्र राऊळ, सुमन राऊळ, सुभाष राऊळ, सुवर्णा राऊळ या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. 

तेंडोली गावठणवाडी येथील गजानन खानोलकर, गुंडू पाटकर, श्रीकांत गुरव, सुनील तळवडेकर, रोशन कुंभार, संतोष कोचरेकर, भूषण मेस्त्री, हर्श नाईक, निखिल पाटकर, विठ्ठल राणे, समीर नाईक आदींनी भाजपात प्रवेश करीत नारायण राणे यांना पाठींबा जाहीर केला.

तेंडोली कुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी आपले विविध विकासात्मक प्रश्न दत्ता सामंत यांच्याकडे मांडले असता केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन श्री. सामंत यांनी दिले. त्यामुळे येथील अरविंद कुंभार, किशोर कुंभार, रमेश कुंभार, नामदेव कुंभार यांच्यासह वाडीतील ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचे दत्ता सामंत यांनी स्वागत करून गावातील विकासाचे प्रश्न भाजपाच्या माध्यमातून मार्गी लावले जातील अशी ग्वाही दिली.

तेंडोली खरावतेवाडी, बोंडाळ गाळवे, घांगार्डेवाडी येथील ग्रामस्थांनी ना. नारायण राणे यांना एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे. गावातील विकासासाठी या निवडणुकीत राणे साहेबांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!