कुडाळ माड्याचीवाडीमध्ये उबाठाला धक्का ; सरपंचांसह शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ भाजपात !
प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेश : ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून गावातील विकास कामे मार्गी लावण्याचे आवाहन
कुडाळ | कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खा. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या आणखी एका बुरुजाला धडक देत हा बुरुज जमीनदोस्त केला आहे. कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला. गावातील विकास कामे सोडवण्याची ताकद फक्त भाजपामध्येच आहे, हे ओळखून आम्ही सर्वांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून ८० % मतदान देण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे.
कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. मात्र गेली दहा वर्षे गावातील विकासाचे कोणतेही काम करण्यात आमदार, खासदारांना यश आलेले नाही. त्यामुळे सरपंच विघ्नेश गावडे आणि शेखर गावडे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खा. निलेश राणेंचे नेतृत्व मान्य करीत शनिवारी सायंकाळी उशिरा भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपास्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी सभापती अभय परब, निलेश तेंडुलकर, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह विभागप्रमुख मंगेश प्रभू, माजी सरपंच दाजी गोलम, बूथ अध्यक्ष अनंत गडकरी, शिवसेनेचे उपविभागप्रमुख रामकृष्ण गडकरी उपस्थित होते.
यावेळी संजय माळकर, महेश परब, गिरीधर गावडे, मनोहर गावडे, पंढरी गावडे, सिद्धेश मुळीक, सीताराम मुळीक, विलास गावडे, योगेश परब, सुनील गावडे, संभाजी गावडे, एकनाथ गावडे, अण्णा परब, रवी परब, करुणा गावडे, सारिका गावडे, भाग्यश्री गावडे, रेखा गावडे, सुगंधा गावडे आदींनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी गावातील सर्व विकास कामे भाजपाच्या माध्यमातून केली जातील, असा शब्द दत्ता सामंत यांनी दिला.
१९९० पूर्वी जिल्ह्यात पायाभूत सुविधा नव्हत्या. रस्ते, पाणी, वीज, शिक्षणाची सुविधा नव्हती, आरोग्याची व्यवस्था नव्हती. एक दोन मुख्य रस्ते वगळता खेडोपाडी रस्ते नव्हते. पण राणे साहेब जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी २०१४ पर्यंत खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास केला, गावागावात रस्ते केले. पाणी, शिक्षण, आरोग्य, वीजेचे प्रश्न सोडवले. त्यानंतर २०१४ मध्ये विनायक राऊत, वैभव नाईक हे निवडून आले. मात्र गावातील २०० मिटरचा रस्ता देखील ते करू शकले नाहीत. त्यामुळे शाश्वत विकासा साठी ग्रामस्थांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे दत्ता सामंत यांनी सांगितले.